पोस्ट्स

सततच्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे आरसोली ग्रामस्थ करणार नांगरासकट ट्रॅक्टर द्वारे रास्ता रोको आंदोलन.महावितरण कार्यालयास निवेदन.

इमेज
भूम (कुणाल लगाडे). तालुक्यातील आरसोली येथील सततच्या खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झाल्याने ग्रामस्थांनी गुरुवारी उप कार्यकारी अभियंता महावितरण यांना नांगरासकट ट्रॅक्टर द्वारे रास्ता रोको आंदोलन करण्या बाबतचे निवेदन देण्यात आले.मागील दोन महिन्यांपासून गावासाठी व शेतीसाठी होत असलेला वीज पुरवठा दर दहा मिनिटांनी खंडित होत असून याबाबत येथील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात वारंवार संपर्क साधून देखील वीज पुरवठा सुरळीत सुरू होत नसून ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात फोन द्वारे माहिती विचारली असता येथील कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.सध्या पावसाने दडी मारल्याने पाण्या अभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत असून सोयाबीन पिकाला पाणी देण्यासोबतच दुभत्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा देखील गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच महावितरण कडून दिवसा वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने आरसोली येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदिल झाला आहे.त्यामुळे महावितरणच्या या गलथान कारभाराला त्रस्त होऊन येथील शेतकरी,नागरिकांनी गुरुवारी महावितरण कार्यालयास निव...

भूम येथे नऊ शिक्षक रत्नांचा सन्मान

इमेज
भूम (कुणाल लगाडे).  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका भूमच्या वतीने तालुक्यातील नऊ शिक्षकांना संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री बाळकृष्ण तांबारे भूम तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती अनिता जगदाळे,संघाचे राज्य उपाध्यक्ष श्री सोमनाथ टकले,गटशिक्षण कार्यालयाचे शिक्षण विस्ताराधिकारी श्री सूर्यकांत साळुंखे, संघाचे विभागीय कार्याध्यक्ष अर्जुन गुंजाळ, साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री देवराम सर, तालुकाध्यक्ष संजीवन तांबे यांचे उपस्थितीत शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले  याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा भूम येथे संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमान बाळकृष्ण तांबारे यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात तालुक्यातून उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार देण्यात आला. ज्या शिक्षकांचं काम तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं,अतिशय उत्कृष्ट काम करत असतात परंतु शासकीय पुरस्कारासाठी ते स्वतःहून प्रस्ताव सादर करत नाहीत असे शिक्षक या सन्मानापासून वंचित राहू नयेत म्हणून शिक्षक संघाच्या तालुका शाखेने ...

खवा क्लस्टर भूमला महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट.खवा निर्मिती प्रक्रिया, आधुनिक यंत्रसामग्री आणि क्लस्टरच्या कामकाजाची घेतली माहिती

इमेज
भूम (कुणाल लगाडे)  खवा क्लस्टर भूम येथे महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिनांक 1/8/2026 रोजी सदिच्छा भेट देऊन क्लस्टरच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी खवा उत्पादन प्रक्रिया, आधुनिक इंडक्शन खवा मशीनचा वापर, दुग्ध प्रक्रिया उद्योगातील नवीन तंत्रज्ञान तसेच क्लस्टरच्या माध्यमातून शेतकरी व दुग्ध उत्पादकांना उपलब्ध होणाऱ्या व्यवसायाच्या संधींबाबत माहिती देण्यात आली.या भेटीदरम्यान धाराशिवचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विद्याचरण कडवकर, भूमच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती ज्योती चौहान, भूमचे तहसीलदार जयवंत पाटील, परंड्याचे तहसीलदार निलेश काकडे, वाशीचे तहसीलदार प्रकाश मेत्रे, भूमचे मंडळ अधिकारी विद्याधर कोळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी खवा क्लस्टरमधील उत्पादन व्यवस्था, यंत्रसामग्री, स्वच्छता, ऊर्जा बचत करणारी इंडक्शन प्रणाली तसेच खवा उद्योगाच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. पारंपरिक खवा उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनाचा दर्जा वाढविणे, इंधन व ऊर्जा खर्च कमी करणे आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती करणे या क्लस्टरच्या प्रयत्नांचे अ...

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कष्टकऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

इमेज
भूम (कुणाल लगाडे) लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त भूम शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे याही वर्ष जयंती उत्सवात समाजातील मोलमजूरी आपला उदरनिर्वाह करणारे 76 वर्षीय रामलिंग साठे यांना ध्वजारोहणाचा मान देऊन समाजाच्या कृतज्ञतेचा संदेश देण्यात आला. ध्वजारोहणानंतर रामलिंग साठे यांचा पुष्पहार, देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कष्टमय जीवनप्रवासाला सलाम केला. मातंग समाजाच्या वतीने साठेनगर येथील समाज मंदिरासमोर जयंती समिती अध्यक्ष प्रदीप साठे यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले   त्यांच्या समवेत गणेश साठे , नितीन साठे, सचिन साठे, शैलेश साठे, निलेश साठे ,विनोद साठे आकाश साठे , सुजीत साठे , विशाल शिंदे , जितू शिंदे , प्रशांत साठे , हरी लोंढे , गिरीश साठे यांनी कार्यक्रमाचे संयोजन सांभाळले. कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, भाजपाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सौ लक्ष्मी साठे , तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, ...

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४,४५९ नागरिकांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

इमेज
भूम (कुणाल लगाडे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दिवस व माझी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधी मध्ये सर्व विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत २४३ परंडा विधानसभा मतदारसंघात भूम शहरातील रामहरी मंगल कार्यालयात १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात विविध शासकीय विभागांनी स्टॉल उभारून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, प्रमाणपत्रे व विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून दिला.या शिबिरात महसूल, पंचायत समिती, कृषी, नगर परिषद, आरोग्य, पोलीस, परिवहन, पोस्ट, बँका, कौशल्य विकास, आधार केंद्र आदी १९ विभागांनी सहभाग नोंदविला. विविध योजनांचा लाभ ४,४५९ नागरिकांनी घेतला तर १४३ प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. यावेळी भूम तहसीलदार जयवंत पाटील, भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, पंचायत समितीच्या सभापती पूजा ढगे, उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, उपजिल्हाध...

आरसोली येथील संस्कृती गुंजाळ ची राज्यांतर्गत अभ्यासभेट सहलीसाठी निवड.

इमेज
भूम (कुणाल लगाडे) .  तालुक्यातील आरसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी संस्कृती नितीन गुंजाळ हिची राज्य शासनाच्या समग्र शिक्षा २०२५ - २६ मधील राष्ट्रीय आविष्कार अभियान या उपक्रमा अंतर्गत राज्यांतर्गत अभ्यास भेटीसाठी भूम तालुका अंतर्गत निवड करण्यात आली असून ही शासकीय सहल दिनांक ११ मार्च रोजी रवाना झाली.आरसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारच्या अभिनव उपक्रम राबविले जात असून यावेळी संस्कृती नितीन गुंजाळ हिच्या शासनाकडून राज्यांतर्गत अभ्यासभेट सहलीसाठी झालेल्या निवडीमुळे तिच्यासह शाळेच्या ईतर विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार असल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदरील शासकीय  अभ्यासभेट सहल ही दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आली असून या सहलीत लातूर शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या निवडक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याचे गटशिक्षण अधिकारी यांनी सांगितले.या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना राजीव गांधी प्राणी संग्रह...

नवीन पहिलीसाठी पन्हाळवाडी शाळेत फाउंडेशन कोर्स सुरू.

इमेज
भूम (कुणाल लगाडे) पन्हाळवाडी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सन 2026 - 2027 साठी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्याचा फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात आला.यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण तयार झाले असून प्रत्यक्ष प्रवेश घेण्यात येत आहेत याच दिवशी यशस्वी महिलांचे मनोगत तसेच त्यांच्या यशोगाथा घेण्यात आल्या. त्याचबरोबर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनही घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक म्हणून निलेश मांगले तर  उपमुख्याध्यापक म्हणून कुमारी संस्कृती वीर यांनी काम पाहिले.  याच दिवशी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचा नाव नोंदणी व दिक्षांत सोहळा उत्साहात घेण्यात आला.यावेळी गावातील माता पालक , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती सरस्वती पन्हाळे ,सरला पन्हाळे ,रेश्मा पन्हाळे ,वनमाला शिंदे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सोनवणे गीतांजली यांनी तर आभार मुख्याध्यापक रामदास गायकवाड यांनी मानले...

भूम शहरातील जनतेच्या हितासाठी अर्थसंकल्पात दुरुस्ती करून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला. नगराध्यक्षा - सौ संयोगिता संजय गाढवे

इमेज
भूम (कुणाल लगाडे)    भूम नगर परिषद नगराध्यक्ष दालनात भूम नगरपरिषदेचे चालू वर्षाचे २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली यामध्ये प्रामुख्याने अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी ०७ नगरसेवक आणि १४ नगरसेवक विरुद्ध असा अर्थसंकल्प नामंजूर करण्यात आला यासंदर्भात नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी सविस्तर माहिती अशी दिली की अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी ०७ नगरसेवकांनी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली परंतु जनशक्ती आघाडीच्या १४ नगरसेवकांनी याला मंजुरी न दिल्याने अर्थसंकल्पामध्ये काही दुरुस्त्या करून भूम शहराच्या नागरिकांच्या सुख सुविधेसाठी अर्थसंकल्प मंजूर होणे गरजेचे असल्याने तसा अर्थसंकल्प धाराशिवचे जिल्हा अधिकारी यांच्या दालनात मंजुरीसाठी दाखल करण्यात आला आहे.पुढे गाढवे यांनी सांगितले की अर्थसंकल्प सादर करताना मागील २०२४-२५ वर्षाचा अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने पुढील चालू वर्षाचे अर्थसंकल्प सादर केले जात असते. मात्र विरोधक नगरसेवक यांनी चालू अर्थसंकल्पाचा विचार न करता मागील चार वर्षाचा अर्थसंकल याचा लेखाजोखा मागणी करत चालू अर्थसंकल्पाकडे पाठ फिरवली...

भूम पं. स. समोर कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी असहकार आंदोलन.

इमेज
भूम (कुणाल लगाडे). भूम पंचायत समिती समोर जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय व कर्मचारी संघटना यांचे विविध मागण्यासाठी असहकार आंदोलनाचा दुसरा दिवस. याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या सर्व 426 विभागातील लिपिक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणे, जुनी पेन्शन लागू करणे 2005 पूर्वी अनुकंपाच्या प्रतीक्षा सूचिवर असलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू वापरणे इत्यादी मागणीसाठी भूम पंचायत समिती समोर पंचायत समिती, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग इत्यादी विभागातील लिपिक संवर्गातील कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून, मागण्यांच्या घोषणा देत असहकार आंदोलनात सहभागी झाले आहेत.यात ए.आर.कुलकर्णीअध्यक्ष,ए.आर.सय्यद,जे.ए.तांबोळी,ए.एम.भोगे,एन.एन.इंगळे,के.एस.कुटे,आर.व्ही.कांबळे,एम.ए.नागरे,एक,आर,असलकर,एस.एस.डमरे,एस.आर.चव्हाण,के.डी.भोसले,एस.एन.जाधवर,एस.पी.रणदिवे,डी.सी.लाड हे शासकीय निमशासकीय कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

महाशिवरात्री निमित्त मौजे निपाणी येथे कीर्तन सोहळा संपन्न

इमेज
भूम - (कुणाल लगाडे)    मौजे निपाणी येथे महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरासमोर ह.भ.प. मानवीताई महेश ठोंगे (धाराशिवकर) या युवा कीर्तनकार यांचे भावपूर्ण कीर्तन संपन्न झाले. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वकाळात आयोजित या कीर्तनाने उपस्थित भाविकांची मने जिंकली. कीर्तनामध्ये महाशिवरात्रीच्या उपवासाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व, भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेलपत्राचे महत्त्व यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले. तसेच तुकाराम महाराज यांच्या “ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान” या अभंगातील ओळींचे भावार्थ स्पष्ट करून समाधान, श्रद्धा आणि भक्ती यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आला.या कीर्तन सोहळ्यात युवा मुलीने टाळकरी म्हणून सुंदर साथ दिली. गायक, मृदंगाचार्य, विणेकरी आदींच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थितहोते.महाशिवरात्रीच्या निमित्ताने झालेल्या या कीर्तनामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

पन्हाळवाडी शाळेत तंबाखूमुक्त जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.

इमेज
भूम - (कुणाल लगाडे)    भूम तालुक्यातील पन्हाळवाडी शाळेत तंबाखू मुक्त शाळा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसमवेत गावात प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती ,आरोग्यावर होणारे परिणाम त्याचबरोबर सामाजिक आरोग्य याविषयी जनजागृती करणारे घोषवाक्य विद्यार्थ्यांनी तयार केली.तंबाखू विरोधी पोस्टर्स मुलांनी रंगवले व त्याचे प्रदर्शनही भरवण्यात आले. या कार्यक्रमात अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.यावेळी मुख्याध्यापक रामदास गायकवाड तसेच सहशिक्षिका गीतांजली सोनवणे याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ती सरस्वती पन्हाळे तसेच सरला पन्हाळे , रेश्मा पन्हाळे , वनमाला शिंदे आणि गावातील अनेक महिलांनी सहभाग घेतला.

भूम पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा का शिवसेनेचा झेंडा फडकणार दोन्हीचे बलाबल सारखे.

इमेज
भूम ( कुणाल लगाडे )  भूम तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होऊन काही मताच्या फरकाने या ठिकाणी विजयी उमेदवार झाले आहेत भूम तालुक्यातील जि प च्या शिवसेनेला ३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागेवर विजय प्राप्त करण्यात यश आले आहे तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीला ४, शिवसेना ५,वंचित १, राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडी यांची या निवडणुकीत आघाडी झाली होती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजप व शिवसेना शिंदे गट हे स्वतंत्र निवडणूक लढवत होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना या ठिकाणी यश प्राप्त झाले आहे तर वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी यांची युती असल्याने त्यांना पंचायत समितीची एक जागा मिळालेली आहे त्यामुळे सभापती उपसभापती कोणाचा होईल या साक्षांकता निर्माण होताना दिसते आहे. दरम्यान ईट जिल्हा परिषदे मधून राष्ट्रवादीच्या शुभांगी सुनील देशमुख यांचा विजय झाला आहे तर ईट पंचायत समिती च्या जागेवर बाळासाहेब रामभाऊ खरवडे राष्ट्रवादी काँग्रेस यांचा तर पखरूड पंचायत समिती मधून वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका प्रवीण रणबागुल...

भूम तालुका जि.प.पं.स. निवडणुकीसाठी दि. १९ रोजी १९२ उमेदवाराने ३८० अर्ज खरेदी.

इमेज
भूम (कुणाल लगाडे)   भूम तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती २०२६ चा आखाडा पेटला असून यात दि.१९ रोजी १९२ उमेदवारांनी ३८० अर्ज खरेदी केले. भूम तालुक्यात पाच जिल्हा परिषदेच्या व १० पंचायत समितीच्या जागा असून दि.१९रोजी ईट जिल्हा परिषदेसाठी वर्षा ज्ञानेश्वर गीते यांचा शिवसेना व अपक्ष असे ०२ अर्ज प्राप्त झाले.पाथरूड जिल्हा परिषदेसाठी बालाजी उमराव गटकळ यांचा एनसीपीच्या वतीने अर्ज दाखल झाला असून ज्ञानेश्वर सोपान गीते यांचे शिवसेना व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत तर विठ्ठल भारत सुरवसे यांचा अपक्ष अर्ज दाखल झाला .वालवड जि प साठी अनिता भास्कर वारे यांचे ०२ क्रांतिकारी शेतकरी संघटना व अपक्ष अर्ज प्राप्त झाले आहेत उर्वरित गटात अजून कुठलाही अर्ज प्राप्त झाला नाही.पंचायत समिती साठी पखरुड मधून अनभुले साखरबाई नामदेव यांचे ०२ अर्ज तर सुकटा पं. सं. साठी रा.स.पाचे विकास रणजीत पाटील यांचा अर्ज प्राप्त झाला असे एकूण जि.प.साठी ०८ व पं. स.साठी ०३ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली. दरम्यान कुठल्याही उमेदवाराने अद्याप एबी फॉर्म जोडला नसल्याची माहिती मिळाली आहे.