भूम तालुका जि.प.पं.स. निवडणुकीसाठी दि. १९ रोजी १९२ उमेदवाराने ३८० अर्ज खरेदी.


भूम (कुणाल लगाडे)  भूम तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती २०२६ चा आखाडा पेटला असून यात दि.१९ रोजी १९२ उमेदवारांनी ३८० अर्ज खरेदी केले. भूम तालुक्यात पाच जिल्हा परिषदेच्या व १० पंचायत समितीच्या जागा असून दि.१९रोजी ईट जिल्हा परिषदेसाठी वर्षा ज्ञानेश्वर गीते यांचा शिवसेना व अपक्ष असे ०२ अर्ज प्राप्त झाले.पाथरूड जिल्हा परिषदेसाठी बालाजी उमराव गटकळ यांचा एनसीपीच्या वतीने अर्ज दाखल झाला असून ज्ञानेश्वर सोपान गीते यांचे शिवसेना व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहेत तर विठ्ठल भारत सुरवसे यांचा अपक्ष अर्ज दाखल झाला .वालवड जि प साठी अनिता भास्कर वारे यांचे ०२ क्रांतिकारी शेतकरी संघटना व अपक्ष अर्ज प्राप्त झाले आहेत उर्वरित गटात अजून कुठलाही अर्ज प्राप्त झाला नाही.पंचायत समिती साठी पखरुड मधून अनभुले साखरबाई नामदेव यांचे ०२ अर्ज तर सुकटा पं. सं. साठी रा.स.पाचे विकास रणजीत पाटील यांचा अर्ज प्राप्त झाला असे एकूण जि.प.साठी ०८ व पं. स.साठी ०३ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती सूत्राकडून मिळाली. दरम्यान कुठल्याही उमेदवाराने अद्याप एबी फॉर्म जोडला नसल्याची माहिती मिळाली आहे.

“ लोकप्रिय बातम्या ”

तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.

अलंमप्रभु शहर विकास आघाडी भूम ला मतदारांनी ५१ टक्के कौल दिला मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.

भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.