भूम नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील दोन दिग्गजांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड.

भूम - ( कुणाल लगाडे )  भूम नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पिटासन अधिकारी तथा नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१६ जाने.२०२६ रोजी झाली.याप्रसंगी जनशक्ती नगर विकास आघाडीच्या उपनगराध्यक्षपदी लक्ष्मी साठे यांची निवड करण्यात आली. तर स्वीकृत नगरसेवक म्हणून भूम शहराचे दिग्गज नेते व अलंप्रभू शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा संजय गाढवे यांची निवड करण्यात आली तर जनशक्ती भूम शहर विकास आघाडीच्या वतीने पॅनल प्रमुख युवकांचे आयडॉल यशवंत राजे थोरात यांची निवड करण्यात आली दोन्ही आघाड्याकडून एक एक अर्ज आल्याने ही निवड झाली. दरम्यान अलंमप्रभू शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षा यांना  मताधिक्य कमी असल्याने त्यांचा उपनगराध्यक्ष व प्रतोत न होता जनशक्ती विकास आघाडीकडे बहुमत असल्याने ही दोन्ही पदे त्यांच्याकडे गेले त्यात प्रतोत म्हणून विठ्ठल बागडे यांची निवड केली.
दोन्ही आघाड्याकडून आपआपले गटनेते निवडले यात  अलंमप्रभू आघाडी कडून सुरज गाढवे तर जनशक्तीकडून रुपेश शेंडगे यांची निवड करण्यात आली. या सर्वसाधारण सभेत जनशक्तीचे १४ नगरसेवक तर अलंप्रभु आघाडीचे सहा नगरसेवक सह अध्यक्षा उपस्थित होते.स्वीकृत सदस्य सह उपनगराध्यक्षा यांचा सत्कार जनशक्ती शहर विकास आघाडीचे अध्यक्ष विजयसिंह राजे थोरात, भाजपाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी केला, नगरपरिषदेतील मुख्याधिकाऱ्याचा चार्ज असणारे  नायब तहसीलदार प्रवीण जाधव व नगरपरिषद कर्मचारी यांनी नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षा सह स्वीकृत सदस्य यांचा सत्कार केला. याप्रसंगी जनशक्तीचे १४ नगरसेवक तर अलंमप्रभू भूम शहर विकास आघाडीचे जनतेतून निवडून आलेल्या अध्यक्षा सह सहा नगरसेवक उपस्थित होते.

“ लोकप्रिय बातम्या ”

तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.

अलंमप्रभु शहर विकास आघाडी भूम ला मतदारांनी ५१ टक्के कौल दिला मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.

भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.