पन्हाळवाडी शाळेत तंबाखूमुक्त जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.
भूम - (कुणाल लगाडे) भूम तालुक्यातील पन्हाळवाडी शाळेत तंबाखू मुक्त शाळा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसमवेत गावात प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती ,आरोग्यावर होणारे परिणाम त्याचबरोबर सामाजिक आरोग्य याविषयी जनजागृती करणारे घोषवाक्य विद्यार्थ्यांनी तयार केली.तंबाखू विरोधी पोस्टर्स मुलांनी रंगवले व त्याचे प्रदर्शनही भरवण्यात आले.
या कार्यक्रमात अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.यावेळी मुख्याध्यापक रामदास गायकवाड तसेच सहशिक्षिका गीतांजली सोनवणे याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ती सरस्वती पन्हाळे तसेच सरला पन्हाळे , रेश्मा पन्हाळे , वनमाला शिंदे आणि गावातील अनेक महिलांनी सहभाग घेतला.