भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४,४५९ नागरिकांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ
भूम (कुणाल लगाडे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्म दिवस व माझी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधी मध्ये सर्व विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियाना अंतर्गत २४३ परंडा विधानसभा मतदारसंघात भूम शहरातील रामहरी मंगल कार्यालयात १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात विविध शासकीय विभागांनी स्टॉल उभारून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, प्रमाणपत्रे व विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून दिला.या शिबिरात महसूल, पंचायत समिती, कृषी, नगर परिषद, आरोग्य, पोलीस, परिवहन, पोस्ट, बँका, कौशल्य विकास, आधार केंद्र आदी १९ विभागांनी सहभाग नोंदविला. विविध योजनांचा लाभ ४,४५९ नागरिकांनी घेतला तर १४३ प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
यावेळी भूम तहसीलदार जयवंत पाटील, भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संयोगिता गाढवे, पंचायत समितीच्या सभापती पूजा ढगे, उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन (मांजरा प्रकल्प) संतोष राऊत, जिल्हा परिषद सदस्या जयश्री काळे व विजयमाला मारकड, पंचायत समिती सदस्य श्रीलता लोखंडे, साधना सुबुगडे, प्रशांत मुंडेकर, तसेच भूम व वाशी नगर परिषदेचे नगरसेवक, पत्रकार बांधव, विविध विभागातील शासकीय कर्मचारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराद्वारे विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.