अलंमप्रभु शहर विकास आघाडी भूम ला मतदारांनी ५१ टक्के कौल दिला मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.


भूम प्रतिनिधी -कुणाल लगाडे 
अलंमप्रभु शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सन्मान विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांनी ज्या नागरिकांनी विकासाला मतदान केले त्यांचे आभार मानले. विकासाला मतदान न केलेल्यांनाही साष्टांग दंडवत घालून नम्रतेने धन्यवाद दिले. शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्षाचा सन्मान विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा ज्या लोकांनी विकासाला मतदान केलं त्यांचे त्यावेळी त्यांनी आभार मानले. विकासाला मतदान केले नाही त्यांना साष्टांग दंडवत करत लग्न झाल्यानंतर मी सासऱी आल्यावर येथे विकास नव्हता परंतु मी आल्यानंतर विकास केला तरी सुद्धा मतदारांना कौल दिला नाही परंतु त्यांचे आभार मानले. नवऱ्याचा स्वभाव बदलण्यात मी यशस्वी झाले परंतु त्यांचा स्वभाव तसाच असता तर आत्ता अजूनही आपली सत्ता आहे. पुढेही राहणार आहे. काहीतरी चूक झाल्यामुळे आपले नगरसेवक कमी आले असले तरी खचून न जाता आपण विकास कामे करणार आहोत असे त्यांनी सांगितले. अमृत०.२ योजना पूर्ण होणारच आश्वासन त्यांनी दिले पूर्वीप्रमाणेच नळपट्टी घेणार असे नवनिर्वाचित नगराध्यक्षा संयोगिताताई गाढवे यांनी सांगितले. व मतदारांच्या आभार मानले. याप्रसंगी वंचित नेते प्रवीण रणबागुल, आघाडी प्रमुख संजय साबळे, अर्चनाताई दराडे, नवनिर्वाचित नगराध्यक्षा संयोगिताताई गाढवे,रिमा ब्रह्मदेव शिंदे, सुरज सुभाष गाढवे, सुनील पांडुरंग थोरात, मधून नूतन बाळासाहेब सुर्वे, शितल तानाजी शिंदे, बापू विष्णू बाराते, राणी संतोष वडेकर, अतुल अनिल उपरे, नेहा किरण साठे, धनाजी अर्जुन मस्कर, अभिजीत रमाकांत शेटे, मंगल हनुमंत नाईकवाडी, दिपाली बाळकृष्ण टकले, मुशीर जमीर शेख, भाग्यश्री राजू माने, तोफिक सत्तार कुरेशी,योगेश ज्ञानेश्वर असलकर, मंगल अरुण आकरे, आकुबाई भारत पवार, श्रीराम राजेंद्र बोराडे यांच्यासह दत्ता साठे,अण्णा साठे, संजय शिंदे,झुंबर गायकवाड,प्रभावती गाढवे,मंगल डाके,सुरेखा गाढवे,रोहन जाधव,दिलिप गाढवे,सुपनर ,बाबा माने, बाळासाहेब गवळी, संजय होळकर श्रीराम मुळे, मनिषा भोसले, शुभांगी गाढवे, सोमनाथ लोखंडे,अरूण सोनटक्के यांच्या सह अलंमप्रभु शहर विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“ लोकप्रिय बातम्या ”

तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.

भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.