नवीन पहिलीसाठी पन्हाळवाडी शाळेत फाउंडेशन कोर्स सुरू.

भूम (कुणाल लगाडे) पन्हाळवाडी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सन 2026 - 2027 साठी पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन महिन्याचा फाउंडेशन कोर्स सुरू करण्यात आला.यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण तयार झाले असून प्रत्यक्ष प्रवेश घेण्यात येत आहेत याच दिवशी यशस्वी महिलांचे मनोगत तसेच त्यांच्या यशोगाथा घेण्यात आल्या. त्याचबरोबर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिनही घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक म्हणून निलेश मांगले तर  उपमुख्याध्यापक म्हणून कुमारी संस्कृती वीर यांनी काम पाहिले. 

याच दिवशी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांचा नाव नोंदणी व दिक्षांत सोहळा उत्साहात घेण्यात आला.यावेळी गावातील माता पालक , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती सरस्वती पन्हाळे ,सरला पन्हाळे ,रेश्मा पन्हाळे ,वनमाला शिंदे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सोनवणे गीतांजली यांनी तर आभार मुख्याध्यापक रामदास गायकवाड यांनी मानले.

“ लोकप्रिय बातम्या ”

तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.

अलंमप्रभु शहर विकास आघाडी भूम ला मतदारांनी ५१ टक्के कौल दिला मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.

भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.