भूम पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा का शिवसेनेचा झेंडा फडकणार दोन्हीचे बलाबल सारखे.
भूम ( कुणाल लगाडे ) भूम तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीची लढत होऊन काही मताच्या फरकाने या ठिकाणी विजयी उमेदवार झाले आहेत भूम तालुक्यातील जि प च्या शिवसेनेला ३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ जागेवर विजय प्राप्त करण्यात यश आले आहे तर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीला ४, शिवसेना ५,वंचित १, राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडी यांची या निवडणुकीत आघाडी झाली होती तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजप व शिवसेना शिंदे गट हे स्वतंत्र निवडणूक लढवत होते त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना या ठिकाणी यश प्राप्त झाले आहे तर वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी यांची युती असल्याने त्यांना पंचायत समितीची एक जागा मिळालेली आहे त्यामुळे सभापती उपसभापती कोणाचा होईल या साक्षांकता निर्माण होताना दिसते आहे. दरम्यान ईट जिल्हा परिषदे मधून राष्ट्रवादीच्या शुभांगी सुनील देशमुख यांचा विजय झाला आहे तर ईट पंचायत समिती च्या जागेवर बाळासाहेब रामभाऊ खरवडे राष्ट्रवादी काँग्रेस यांचा तर पखरूड पंचायत समिती मधून वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका प्रवीण रणबागुल यांचा विजय झाला आहे. सुकटा जिल्हा परिषदेमधून विजयमाला भाऊसाहेब मारकड या तर सुकटा पं.स. मधून गोयकर कृष्णा लक्ष्मण तर आरसोली पंचायत समिती मधून मुंढेकर प्रशांत मारुती हे शिवसेनेचे शिलेदार विजयी झाले आहेत.
पाथरूड जिल्हा परिषदेमधून अमोल नारायण भोरे. तर पाथरूड पंं.स.मधून प्रदीप प्रकाश शेळके, आंबी पं.स. मधून प्रियांका युवराज गटकळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिलेदार निवडून आले. वालवड जीप गटातून जयश्री बालाजी काळे, वालवड पं.स. मधून साधना शंकर सुबुगडे, तर चिंचोली मधून श्रीलता संतोष लोखंडे हे शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहे. आष्टा जिल्हा परिषद गटातून अंधारे साधना बापूसाहेब या शिवसेनेतून विजयी झाल्या आहेत तर आष्टा पं.स.गणातून पूजा विशाल ढगे या शिवसेनेतून विजयी झाल्या तर माणकेश्वर पं.स. मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोज कुंडलिक अंधारे यांचा विजय झाला आहे. सर्व विजयी उमेदवारांनी भूम शहरातील गोलाई चौकामध्ये रॅली काढून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व भाजप यांना कुठेही यश प्राप्त झाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांची आघाडी होऊन त्यांना पाच जागा मिळाले आहे तर शिवसेनेला पाच जागा मिळालेल्या आहेत यामुळे पंचायत समितीसाठी दोन्हीचे बलाबल एक असल्याने सभापती कोणाचा होईल यावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी मंत्री आमदार तानाजीराव सावंत व माजी आमदार राहुल भैया मोटे या दोघांपैकी कोणाचा सभापती होईल याची चर्चा भूम तालुक्यात होताना दिसत आहे.