पन्हाळवाडी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती सीसीटीव्ही च्या उद्घाटनाने साजरी.
भूम ( कुणाल लगाडे ) भूम तालुक्यातील पन्हाळवाडी शाळेत आज सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सुकटा केंद्राचे केंद्रप्रमुख बंडू म्हेत्रे व शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा लक्ष्मी जितेंद्र निरपळ यांनी केले.यानंतर मान्यवरांच्या हस्ते जयंतीचे औचित्य साधून शाळेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले.त्याचबरोबर शाळेत परसबाग व गांडूळ खत प्रकल्पाचे ही उद्घाटन करण्यात आले तसेच नवोपक्रम स्पर्धा पूर्व प्राथमिक शिक्षण जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक आल्याबद्दल अंगणवाडी कार्यकर्ती सरस्वती पन्हाळे यांचा व युवा प्रशिक्षक प्रीती पवार यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी मुलींनी - *वंदन सावित्रीला* - हे गीत सादर केले. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे, विविध गीते, महिलांची भाषणे झाली.
यावेळी सोनाली निरपळ,आरती पन्हाळे, शामबाला पन्हाळे, सरस्वती निरपळ, सविता लोकरे, पल्लवी पन्हाळे, सोनाली मांगले, शितल पन्हाळे, सविता पन्हाळे, अनिता पन्हाळे ,जनाबाई पन्हाळे, सीमा निरपळ , अनुराधा निरपळ , सखुबाई निरपळ , सुषमा पन्हाळे, गंगा लोकरे,सरला पन्हाळे, निकिता निरपळ, प्रियंका तुपे, काशीबाई मांगले, रूपाली निरपळ , प्रियंका निरपळ इत्यादी अनेक महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक रामदास गायकवाड यांनी तर आभार गीतांजली सोनवणे यांनी मानले.