भूम येथे गणेश जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

भूम ( कुणाल लगाडे )  भूम शहर व परिसरातील भाविकांना कळविण्यात येते की सालाबादप्रमाणे यंदाही विघ्नहर्ता गणेश जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.या उत्सवानिमित्त विविध महिला भजनी मंडळांचे भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत जगदंबा महिला भजनी मंडळ तर दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत सिद्धी विनायक महिला भजनी मंडळ यांचे भजन होणार आहे.मुख्य गणेश जयंती कार्यक्रम माघ शुद्ध चतुर्थी, गुरुवार दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते ८ श्रींची महापूजा, सकाळी ८ ते ९.३० सामुदायिक हवन, तसेच सकाळी १० ते १२ या वेळेत विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ  यांचे भजन होऊन फुले उधळण करत गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दुपारी १२.३० वाजता महाआरती, दुपारी १ ते ४.३० महाप्रसाद व सायंकाळी ५.३० वाजता श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.हे संपूर्ण कार्यक्रम विघ्नहर्ता गणेश मंदिर, समर्थनगर, भूम येथे होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

“ लोकप्रिय बातम्या ”

तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.

अलंमप्रभु शहर विकास आघाडी भूम ला मतदारांनी ५१ टक्के कौल दिला मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.

भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.