माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांचा गोरमाळा येथील ग्रामस्थांच्या व वालवड जिल्हा परिषद गटाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.


भूम - (कुणाल लगाडे) आज मौजे गोरमाळा येथे  ग्रामस्थांच्या व वालवड जिल्हा परिषद गटाच्या वतीने भूम नगरीच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा सौ संयोगिता ताई गाढवे यांची नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ताईंचा,सर्व नगरसेवक बंधू भगिनींचा भव्य नागरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी नानांना ग्रामस्थांच्या वतीने केक कापून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती निलेश शेळवणे,आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे,मा.नगरसेवक संदीप मोटे,सचिन नाईकवाडी ॲड.पंडित ढगे,अतुल शेळके यांच्यासह गावातील सरपंच उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,महिला भगिनी ग्रामस्थ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

“ लोकप्रिय बातम्या ”

तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.

अलंमप्रभु शहर विकास आघाडी भूम ला मतदारांनी ५१ टक्के कौल दिला मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.

भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.