रायझिंग स्टार इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात. विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान आवश्यक - सुरेशभाऊ कांबळे.
भूम ( कुणाल लगाडे ) आपण भारताची संस्कृती ही जोपासत असता ती जोपासून ती विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवली पाहिजे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान आवश्यक आहे. जगात टिकायचे असेल तर आलेल्या संकटावर मात करुन पुढे जात रहावे व स्वतः मध्ये बदल करावा असे मत संस्था अध्यक्ष सुरेशभाऊ कांबळे यांनी आयोजित बाल आनंद मेळाव्या मध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना केले.भूम येथील रायझिंग स्टार इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. बाल आनंद मेळाव्यात नर्सरीच्या वर्गापासून ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत ३० हुन अधिक स्टॉल उभारण्यात आले होते. विविध साहित्याचे प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होण्यासाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल थाटण्यात आले होते.
बाल आनंद मेळावा पाहण्यासाठी भूम सह परिसरातील नागरिकांसह पालकांनी गर्दी केली होती.या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी मुलांनी भेळ, पॅटिस, पाणीपुरी, ढोकळा, इडली, मॅगी, तसेच शरीरासाठी पोषक असे पालेभाज्या व फळे हेही विक्रीसाठी आणण्यात आले होते. उपक्रमामागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, पैशाचे महत्त्व, खरेदी-विक्रीची पद्धत, नफा-तोटा याची ओळख करून देणे हा होता. सदरील आनंद बाजार उपक्रमासाठी व्यवस्थापक हरिष धायगुडे, प्राचार्या भाग्य जैन,शीतल बावकर सह सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.