विकासरत्न संजय नाना गाढवे प्रतिष्ठानच्यावतीने भूम तालुक्यातील पत्रकारांचा पत्रकार दिनानिमित्त सन्मान.
भूम - ( कुणाल लगाडे ) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मा.नगराध्यक्ष,विकासरत्न श्री संजय नाना गाढवे यांच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व दर्पण दिनानिमित साहिल कॉम्प्लेक्स येथे भूम नगरीच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा सौ.संयोगिता ताई गाढवे,युवा नेते साहिल आप्पा गाढवे,डॉ.सई गाढवे व सर्व सन्मानीय नगरसेवक बंधू भगिनींच्या हस्ते गौस शेख, मुकुंद लगाडे, आबासाहेब बोराडे, अरुण देशमुख, विश्वनाथ पल्ले, औदुंबर जाधव, अजित बागडे, आशिष बाबर, सुनीलकुमार डुंगरवाल, नितीन गुंजाळ, अख्तर जमादार, प्रमोद कांबळे, अरविंद शिंदे, धनंजय शेटे, रोहित चंदनशिवे या सन्माननीय पत्रकार बांधवांचा साहिल कॉम्प्लेक्स येथे यथोचित सन्मान करण्यात आला व सर्वांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी नगरसेवक सुरज गाढवे,तोफिक कुरेशी,अभिजीत शेटे,श्रीमती मंगल नाईकवाडी,रिमा शिंदे,भाग्यश्री माने,मंगल आकरे,आक्कुबाई पवार,राणी वाडेकर,शितल शिंदे, मुशीर भाई शेख,सुनील थोरात,बापू बाराते,योगेश आसलकर काकासाहेब बोराडे,अतुल उपरे,किरण साठे, बाळासाहेब अंधारे,विष्णू शिंदे,बालाजी माळी,बंटी माळी,डॉ.आकाश भोसले,अमोल सरवसे,तानाजी शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
