आरसोली येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

भूम-( कुणाल लगाडे ) भूम तालुक्यातील आरसोली येथील जिल्हा परिषद शाळेत "क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती"  दि ३ जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच सुशीलाताई पाटील यांनी उपस्थित राहून सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा  घेतला. सुशीलाताई पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान, सामाजिक क्रांतीतील महत्त्व आणि म. फुले यांच्या तीन पत्रातील मजकूर आणि आजच्या संदर्भातील उपयुक्तता सांगितली तसेच स्त्रीसक्षमीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांवर सखोल व्याख्यान दिले. त्यांनी सावित्रीबाईंच्या विचारांची आजच्या काळातील महत्त्वपूर्ण आवश्यकता स्पष्ट केली.
दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरण, महिलांवरील अन्यायाविरोधात वाचा फोडणारे नाट्यकरन सादर केले. 

 कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजाभाऊ काळे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका शारजा सुरवसे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब भगत, शिक्षक तात्या ढोरे, परशुराम थाटे, जमील तांबोळी, अमोल कोल्हाले, श्री गायकवाड व नागरिक उपस्थित होते.

“ लोकप्रिय बातम्या ”

तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.

अलंमप्रभु शहर विकास आघाडी भूम ला मतदारांनी ५१ टक्के कौल दिला मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.

भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.