शाकंभरी महोत्सवानिमित्त येथील वडार गल्लीत मांढरादेवीची विधिवत पूजा.
भूम ( कुणाल लगाडे ) भूम शहरातील वडार गल्ली येथे शाकंभरी महोत्सवानिमित्त मांढरदेवीची विधिवत पूजा सामाजिक कार्यकर्त्या सत्वशीला धनाजीराव थोरात यांच्या हस्ते करण्यात आली.यानिमित्ताने महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरसेवक चंद्रमणी गायकवाड, यशवंत राजे थोरात, रुपेश अप्पा शेंडगे,आबासाहेब मस्कर, संतोष सुपेकर, चंद्रकला पवार यांच्या हस्ते सत्वशीला थोरात यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मा.नायब तहसीलदार हरिश्चंद्र पवार, महादेव जाधव, दीपक पवार, राहुल पवार, अंकुश पवार, दिलीप पवार, शिवदास पवार, मा. नगरसेवक तानाजी वडेकर, ॲड.अरुण मंजुळकर, आशाबाई पवार, रेखा पवार ,प्रियंका पवार यांच्यासह वडार गल्लीतील सर्व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.