तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.
भूम -( कुणाल लगाडे ) येथील जिल्हा परिषद प्रशाला भूम येथे १९८७/८८ च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. ११जानेवारी२०२६गेटटूगेदर साठी प्रथमता रांगेत उभा राहून राष्ट्रगीताने,शाळेमध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी बेंचवर बसून हजेरी दिली नंतर जे विद्यार्थी उशिरा उपस्थित झाले त्यांना शिक्षकांच्या छड्या किंवा शिक्षा देण्यात आली तदनंतर याच ठिकाणी नाश्ता झाला व पुढील कार्यक्रम आकरे मंगल कार्यालय मध्ये आगे कुछ झाल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी जे गुरुजी व विद्यार्थी दिवंगत झालेले आहेत अशांना आदरांजली अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सातपुते सर रेंगे सर जगदाळे सर व जिल्हा परिषद शाळेचे कार्यरत मुख्याध्यापक कांबळे सर यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर आलेल्या दहावीतील सर्व विद्यार्थ्यांचे स्वतःहून ओळख करून देण्यात आले कारण बऱ्याच कालावधीनंतर हे विद्यार्थी भेटल्याने त्यांचे चेहरे एकमेकांना ओळखू येत नव्हते म्हणून सर्वांनी स...