भूम - भूमच्या कन्या सौ.सत्यवती रेंगे-डोके यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्षा सौ.संयोगिता ताई गाढवे यांच्या हस्ते सत्कार.



भूम -  ( कुणाल लगाडे ) 
शहराची कन्या आणि किशोर डोके यांच्या धर्मपत्नी सौ.सत्यवती किशोर रेंगे-डोके यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. या निवडीनंतर त्यांनी शहराचे मा.नगराध्यक्ष,विकासरत्न श्री.संजय (नाना) गाढवे यांच्या 'सार्थक' निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी नगराध्यक्षा सौ. संयोगिताताई संजय गाढवे  आणि संजय नाना गाढवे यांच्या हस्ते जिल्हा न्यायाधीश सौ.सत्यवती रेंगे-डोके यांचा तुळजा भवानी देवीची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी गुरुवर्य श्री.शेषेराव रेंगे यांचा देखील नानांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.आपल्या शहराच्या लेकीने न्यायदानाच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारल्याबद्दल गाढवे परिवाराकडून त्यांचे कौतुक करत पुढील उज्ज्वल कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी ॲड.पोपटराव गाढवे,ॲड.अमरसिंह ढगे,ॲड.पंडित ढगे,ॲड.अमर जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

“ लोकप्रिय बातम्या ”

तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.

अलंमप्रभु शहर विकास आघाडी भूम ला मतदारांनी ५१ टक्के कौल दिला मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.

भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.