भूम - भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा संयोगिता गाढवे गुरुवारी पदभार स्वीकारणार.

 

भूम - ( कुणाल लगाडे )  
नुकत्याच पार पडलेल्या भूम नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा संयोगिता गाढवे या गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.या शपथविधी सोहळ्यास शिवसेना(शिंदे गट),वंचित बहुजन आघाडी,आर पी आय पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक,शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक,व्यापारी बांधव,माता भगिनी,तरुण बांधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.भूम नगर परिषदेचा निकाल दिनांक २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला होता.या निवडणुकीत आलमप्रभू भूम शहर विकास आघाडीच्या संयोगिता गाढवे या ७०८६ मतांनी विजयी झाल्या असून गुरुवारी होत असलेल्या शपथविधी सोहळ्यास शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मा.नगराध्यक्ष संजय गाढवे व आघाडीचे अध्यक्ष संजय साबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

“ लोकप्रिय बातम्या ”

तब्बल ३८ वर्षानंतर दहावीतील जिल्हा परिषद प्रशाला भूम चे विद्यार्थी-गेटटुगेदर साठी एकत्र.

अलंमप्रभु शहर विकास आघाडी भूम ला मतदारांनी ५१ टक्के कौल दिला मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी जनतेचे आभार व्यक्त केले.

भूमच्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ संयोगिता गाढवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.